मराठी सिंघमचं बिहारमध्ये भव्य स्वागत
भागलपूर : एका मराठी आयपीएस अधिकाऱ्याने भागलपूरमधील नागरिकांचं मन जिंकलंय. हा मराठी सिंघम लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे, कायदा आणि सुव्यवस्था यासोबत मानवता दाखवणारा पोलीस अधिकारी अशी ओळख मराठी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांची बिहारमध्ये झाली आहे.
शिवदीप लांडे हे एका कार्यक्रमात पोहोचले तेव्हा त्यांचं भव्य स्वागत झालं,पाच रूपयात प्रत्येकाला जेवण देण्याचा हा उपक्रम होता, याची सुरूवात शिवदीप लांडे यांच्या हस्ते झालं. तुम्हाला कुणाचं दु:ख पाहून वेदना होत असतील, तर तुम्ही मानवाचा जन्म घेऊन कोणतीही चूक केलेली नाही, असं समजा असं यावेळी शिवदीप लांडे यांनी म्हटलंय, शिवदीप लांडे यांनी यावेळी त्यांच्या फॅन्सने बनवलेला व्हिडीओ देखील शेअर केला आहे.