नवी दिल्ली : मनसे कार्यकर्त्यांमध्ये दम असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, दंडूका तयार आहे, असं आव्हान माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजूंनी दिलं आहे. असहाय्य लोकांसमोर शौर्य कसलं दाखवताय असंही काटजू त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हकलून द्यायचा इशारा मनसेनं दिला होता. पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपटही प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसेनं दिला होता. मनसेच्या या भूमिकेवर काटजूंनी टीका करत थेट आव्हान दिलं आहे.