श्रीनगर : काश्मीरच्या पंपोरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कॅप्टन तुषार महाजन यांना वीरमरण आलं. अवघ्या २६व्या वर्षी भारतमातेचा हा सुपुत्र भारतमातेच्या कुशीत विसावला.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सो जाएगी कल लिपटकर तिरंगे के साथ अलमारी में
देशभक्ति है साहब तारीखों पर जागती है  


पंपोर दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या कॅप्टन तुषार महाजनचं हे व्हॉटसअप स्टेटस. 26 जानेवारीला त्यानं स्टेटस अपडेट केलं होतं. त्यावेळी त्याला कल्पनाही नसेल की महिनाभरात हेच व्हॉटसअप स्टेटस सत्यात उतरणार आहे. 


पण देशासाठी प्राण देणा-या जवानांची देशभक्ती फक्त ठराविक तारखांना उफाळून येत नाही, कारण झेंड्यांची शान अबाधित राखण्याचं त्यांचं व्रत जीवनभराचं असतं. 


तुषारचे वडील सांगतात की तुषारचं देशावर इतकं प्रेम होतं की तो जेव्हा एनडीएमध्ये गेला, त्यावेळी एनडीएत प्रवेश मिळवणारा तो सगळ्यात कमी वयाचा तरुण होता. 



सोळाव्या वर्षी देशाचं रक्षण करण्याची शपथ आणि २६व्या वर्षी देशासाठी प्राण देणं. यालाच म्हणतात जिंदही लंबी हो न हो... बडी जरुर होनी चाहिए.....