मथुरा दंगलीचा मास्टरमाइंड ठार
मथुरा - मथुरा दंगलीचा मास्टरमाइंड ठार झाला आहे. हल्ल्याचा सूत्रधार रामवृक्ष यादव ठार झाला आहे. उत्तर प्रदेशचे डीजीपी जावीद अहमद यांनी याबाबतची माहिती दिलीय. त्याच्या फोटोवरुन ओळख पटली असल्याचं अहमद यांनी सांगितलंय.
रामवृक्ष यादवच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबीयांना कळवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. या दंगलीमध्ये बळींचा आकडा 24च्या घरात गेलाय. पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि स्थानिक पोलिस अधिकारी संतोष कुमार यादव यात शहीद झालेत. 3000 जणांच्या एका खासगी सशस्त्र सैन्यानं पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणी आतापर्यंत 368 जणांना अटक करण्यात आलीय. दरम्यान, मथूरा जळत असताना शुटिंगमध्ये व्यस्त असलेल्या खासदार हेमा मालिनी अखेर मतदारसंघात परतल्या.
मथुरेमध्ये धुमश्चक्री सुरू असताना हेमा मालिनी आपल्या शुटिंगचे फोटो ट्विट करत होत्या. त्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी हे फोटो डिलीट केले. सकाळी मथुरेत आल्यानंतर मात्र खासदार मॅडमनी आपण इथं येऊन किती तत्परता दाखवली असं सांगत स्वतःचेच गोडवे गायले.