नवी दिल्ली : फ्री सेक्स या मुद्यावर नेहमी महिलांना टार्गेट केलं जातं यावर कविता कृष्णन यांनी काही वास्तववादी प्रश्न केले आहेत. ईनाडु इंडियाशी केलेल्या चर्चेत कविता कृष्णन यांनी आपले या विषयावर मत मांडले आहे.


फ्री सेक्स म्हणजे फक्त सहमतीने केलेला सेक्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कविता कृष्णन यांनी महिलांच्या फ्री सेक्स स्वंत्रतेच्या मुद्यावर आपल्या फेसबुक पेजवर लिहलंय, 'फ्री सेक्स म्हणजे फक्त सहमतीने केलेला सेक्स, फ्री सेक्स पतीबरोबर किंवा परपुरुषाबरोबरही असू शकतो, तर जबरदस्तीने केलेला सेक्स म्हणजे बलात्कारच.'


सेक्समध्ये जोर-जबरदस्ती नको...


हे सर्व स्पष्ट करत असताना कविता कृष्णन म्हणतात की, मी आणि माझ्या आईने फेसबुकपेजवर हेच लिहिलंय, 'सेक्स करण्याच्या स्वतंत्रतेबद्दल भीती बाळगण्याची गरज नाही. हे महत्वाचं नाही की तुम्ही, लग्नानंतर पतीसोबत सेक्स करता? किंवा लग्नापूर्वी आणि नंतरही अन्य पुरूषाबरोबर?, मात्र अशा संबंधात दबाव किंवा जबरदस्ती नकोच.'


फ्री सेक्सचा आरोप पुरूषांवर का होत नाही?


'आम्ही स्त्रिया या समाजाला हा प्रश्न विचारतो की, फ्री सेक्सचा आरोप केवळ महिलांवरच का होतो. हा आरोप पुरुषांवर का होत नाही. सर्वात जास्त फ्री तर पुरुष वागतात. महिलांना लज्जास्पद वाटेल असे वर्तन पुरुष करतात आणि स्त्रियांना स्वतंत्रही ते पाहू शकत नाहीत.', असंही कविता कृष्णन यांनी म्हटलं आहे.


फ्री सेक्सला समर्थन किंवा विरोध नाही


प्रश्न फ्री सेक्सला समर्थन देण्याचा किंवा त्याला विरोध करण्याचा नसल्याचं कविता कृष्णन यांनी स्पष्ट केले आहे. मात्र समस्या अशी आहे की, जी महिला सुशिक्षित आहे तिला उद्देशून काही पुरूष अश्लील टिप्पणी करतात आणि बोलतात की, ही स्त्री तर फ्री सेक्स करते, असंही कविता यांनी यावेळी बोलताना सांगितलं.


आईला विचारतात, तुम्ही कधी फ्री सेक्स केला आहे की नाही?


लोक 'वंदे मातरम' हा नारा देतात आणि माझ्या आईला विचारतात की, तुम्ही कधी फ्री सेक्स केला आहे की नाही. आई म्हणते, फ्री सेक्स कोणती वस्तू नाही. सेक्स एकतर दोघांच्या सहमतीने होतो किंवा जबरदस्तीने बलात्कार केला जातो, महिलांनी याची काळजी करू नये, असंही कविता यांनी म्हटलंय.


महिलांच्या स्वतंत्रतेची भीती


कविता कृष्णन म्हणतात, भाजपच्या सुब्रह्मण्यम स्वामींनी माझ्यावर अशीच टिप्पणी केली आहे, असा त्रास आजकल अनेक महिलांना सहन करावा लागत आहे, आणि हे मी स्वत: अनुभवले आहे. परंतु वास्तव हे आहे की, यांना महिलांच्या स्वतंत्रतेची भीती आहे. या लोकांना हे नको आहे की, महिला जाती, धर्म आणि सामाजिक बंधनातून मुक्त होऊन प्रेम करेल किंवा सेक्स करू शकेल. मी आणि माझ्या आईने हीच स्थिती मांडल्याचं त्यांनी सांगितलंय.