नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन १६ तारखेपासून सुरु होतं आहे.  त्यापूर्वी दिल्लीमध्ये आज महत्वाच्या बैठका घेण्यात येणार आहेत. दुपारी ४ वाजता भाजपच्या पार्लमेंट कमिटीची बैठक होईल, संध्याकाळी पाच वाजता एनडीए ची बैठक होईल तर रात्री ७ वाजता सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बैठक होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्जिकल स्ट्राईक, काळा पैसा रोखण्यावर सरकारचे पाऊल यासंदर्भात एनडीए कडून रणनीती ठरवली जाईल. शिवसेनेने ५०० आणि १ हजार नोटा बंद केल्यावरून भाजपवर टिका केली आहे. तसंच, विरोधकांनी शांततेत सभागृह चालू ठेवण्याचे आवाहन लोकसभा अध्यक्षांकडून केले जाईल. या तिन्ही बैठका संसदेत होणार आहेत.