नवी दिल्ली : २०१७मधील पावसाबाबत भारतीय हवामान खात्याने पहिल्यांदाच अंदाज व्यक्त केलाय. यंदाच्या वर्षी पाऊस सामान्य राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. 20 मे च्या सुमारास मान्सूनच्या आगमनाची तारीख समजेल. तसेच जून मध्ये मान्सून संबंधी अधिक माहिती मिळेल असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जून ते सप्टेंबर या कालावधीत ९६ ते १०६ टक्क्यांपर्यंत पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आलीये. ९६ ते १०६ टक्क्यांपर्यंतचा पाऊस हा सामान्य स्थिती मोजला जातो. गेल्यावर्षीही देशात जून ते सप्टेंबरदरम्यान ९७ टक्के पावसाची नोंद झाली होती. 


पाऊस १०६ ते ११० टक्क्यांपर्यंत पडल्यास पाऊस सामान्यपेक्षा अधिक असतो. पाऊस ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत झाल्यास सामान्यपेक्षा कमी असतो. 


हवामान खात्याच्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी ऑगस्टनंतर अल निनोचा परिणाम होण्याची शक्यता आहे.