मु्ख्यमंत्री योगींसाठी सोफा, एसीची सोय
पूंछ येथील हल्ल्यात शहीद झालेल्या प्रेम सागर यांच्या कुटुंबियांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेतली.
नवी दिल्ली : पूंछ येथील हल्ल्यात शहीद झालेल्या प्रेम सागर यांच्या कुटुंबियांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेतली.
या भेटीदरम्यान अजबच प्रकार पाहायला मिळाला. या गावात मुख्यमंत्री येणार म्हणून अधिकाऱ्यांनी जवानाच्या घरात अवघ्या २४ तासांत एसी बसवला. तसेच बसण्यासाठी सोफ्याची सुविधाही केली.
मात्र योगी यांनी भेट दिल्यानंतर अर्ध्या तासाच्या आताच या सर्व सुविधा काढून घेण्यात आल्या. शहीद प्रेम सागर यांचा मुलगा ईश्वर चंद्रने ही माहिती दिली.