नवी दिल्ली : पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केलं आणि उत्तर प्रदेशात ऐतिहासिक यश मिळवलं. त्यानंतर आता भाजपची पुढचं लक्ष्य गुजरातवर असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजप तयारी करत आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं राज्य आहे त्यामुळे भाजपला येथे यश मिळवायचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशात मोदी लाटची लिटमस टेस्ट झाल्यानंतर भाजप लवकरच गुजरातमध्ये निवडणुका घेऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात मॉडलच्या जोरावर पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली होती. याच विकासाच्या मॉडेलवर त्यांनी उत्तर प्रदेशात ऐतिहासिक विजय मिळवला.


यूपीत 325, गुजरातमध्ये 150


उत्तर प्रदेशमध्ये 403 पैकी 325 जागा जिंकणारा भाजप सध्या आनंदात आहे. गुजरातमध्ये आता त्यांनी १५० चं लक्ष्य ठेवलं आहे. गुजरात विधानसभेमध्ये 182 जागा आहेत. सध्या भाजपकडे १२१ जागा आहेत. काँग्रेस ५७ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे.


२०१९ साठी महत्त्वपूर्ण आहे गुजरात  


गुजरातमध्ये भाजप जवळपास २० वर्षापासून सत्तेत आहे. हेच कारण आहे की, २०१९ लोकसभा निवडणुकी आधी गुजरात निवडणूक जिंकणं भाजपसाठी महत्त्वाचं आहे. गुजरातमध्ये जय किंवा पराजयचा मोदींवर सरळ परिणाम होईल. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यानुसार संपूर्ण देशात मोदींची लाट कायम आहे. जर गुजरातमध्ये लवकर निवडणुका झाल्या तर आम्हाला १५० जागा मिळतील.


गुजरातमध्ये अनेक आव्हानं 


जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या सत्तेतून बाहेर पडून केंद्रात आले आहेत तेव्हापासून भाजपसाठी गुजरातमध्ये आव्हाने वाढत आहेत. आरक्षणासाठी पाटीदार समाजाची नाराजी, हार्दिक पटेल, अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष हे आव्हानं भाजपपुढे असणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये भाजपला यांचा सामना करावा लागणार आहे.