नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळातील मंत्री अनिल माधव दवे यांचं निधन झालं आहे. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने अनिल दवे यांचं निधन झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल दवे यांनी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झालं. अनिल दवे हे ६१ वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल माधव दवे यांना ट्ववीटरवर श्रद्धांजली दिली आहे.


अनिल दवे यांचं असं निघून जाणं हे आपल्यासाठीही व्यक्तिगत नुकसान आहे, तसेच अनिल दवे यांना कालचं भेटलो होतो, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.


मध्य प्रदेशातील बडनगर (उज्जैन) येथून अनिल माधव दवे भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते.