मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला
दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराचाही मूहुर्त ठरला आहे. उद्या सकाळी 11 वाजता मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
नवी दिल्ली : दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराचाही मूहुर्त ठरला आहे. उद्या सकाळी 11 वाजता मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातून अकार्क्षम मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे.
उत्तरप्रदेशच्या निवडणूका डोळ्यासमोर मोदींच्या मंत्रिमंडाळात उत्तर प्रदेशचं प्रतिनिधीत्व वाढेल असंही बोललं जातं आहे. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 66 मंत्री आहेत, ती आता 82 वर जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे तर उत्तर प्रदेशातल्या मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल आणि गुजरात भाजपचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम रुपाला यांच्या नावाची चर्चा रंगतेय.
मोदींच्या कोअर टीममध्ये बदलणार नाही असंही बोललं जातंय. सात तारखेला पंतप्रधान आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी हा विस्तार उरकण्याची चिन्हं आहेत.