`मोदींना जगाचे पंतप्रधान करा`
!['मोदींना जगाचे पंतप्रधान करा' 'मोदींना जगाचे पंतप्रधान करा'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2016/06/13/187178-419754-lalumodi05.10.151.jpg?itok=u2GzTFjp)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर काँग्रेस आणि शिवसेनेकडून टीका होत आहे. यामध्ये आता आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचीही भर पडली आहे.
रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर काँग्रेस आणि शिवसेनेकडून टीका होत आहे. यामध्ये आता आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचीही भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनआरआय म्हणजेच अनिवासी भारतीय बनले आहेत. त्यांना जगाचे पंतप्रधान बनवा असा टोला लालूप्रसाद यादव यांनी लगावला आहे.
जगातल्या नेत्यांनी मोदींसाठी जगाचे पंतप्रधान असं पद बनवावं आणि त्या पदावर मोदींना बसवावं असं लालू म्हणाले आहेत. चारा घोटाळ्याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी लालूप्रसाद यादव रांचीमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं.