नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी जोरदार कामाला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यस्था सुधारण्यासाठी काही मोठे निर्णय त्यांनी घेतले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत इलाहाबादमधील फूलपूर येथून काँग्रेसकडून निवडणूक लढवणारा आणि भारताचा माजी क्रिकटर मोहम्मद कैफने योगीच्या या निर्णयावर ट्विट केलं आहे.


अवैध कत्तलखाने आणि अँटी रोमियो स्कॉडबाबत कैफने ट्विट केलं आहे. तो म्हणतो की, टुंडे मिले या मिले, गुंडे न मिले. सर्व बेकायदेशीर गोष्टींवर बंदी घातली पाहिजे. चांगलं पाऊल.'


देशभरातून योगींच्या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतांना कैफने देखील प्रतिक्रिया दिली आहे. हे ट्विटवरुन लोकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.