पाटणा : बिहारच्या सिवान मतदार संघाचे राजदचे माजी खासदार आणि बाहुबली नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांची आज जामिनावर सुटका करण्यात आली. त्यांच्या स्वागताला 30 आमदार आणि 1हजार 300 कारचा ताफा आणण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहाबुद्दीन हा राजीव रौशन खून प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. 11वर्षांनंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आलीये. बिहारमध्ये जंगलराज म्हणुन प्रसिद्ध असणारा शहाबुद्दीनच्या सुटकेमुळे सिवानच्या लोकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावण निर्माण झालंय. 


नितिशकुमार 2006मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा शहाबुद्दीनला दोन भावांच्या हत्येच्या आरोपावरून तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर पत्रकार राजीव रंजन हत्येप्रकरणात त्यांचं नाव येताच त्यांना सिवानहून भागलपूर तुरुंगात हलवण्यात आलं.