नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंना अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे.  याविषयी बोलताना भागवत म्हणाले, 'इतर धर्मिय लोक ज्यावेळी जास्त मुलं जन्माला घालत असताना, हिंदूंनो तुम्हाला कोणत्या कायद्याने थांबवले आहे?' असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भागवत राजधानी दिल्लीत विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षकांच्या संमेलनात बोलत होते.


यावेळी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देताना भागवत यांनी तुमचे म्हणणे केंद्र सरकारकडे पोहचवू असे सांगितले. तसेच 'तुम्ही लोक म्हणत आहात की 'त्यांची' संख्या वाढत आहे. मात्र हिंदूंना कोणी रोखले आहे. तसेच तुम्ही तुमचे प्रश्‍न पत्र लिहून शिक्षण मंत्र्यांना कळवा, असे आवाहनही त्यांनी शिक्षकांना केलं.