मोहन भागवतांचे गोरक्षकांना खडे बोल
गोहत्येविरोधात राष्ट्रीय कायदा असावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली.
नवी दिल्ली : गोहत्येविरोधात राष्ट्रीय कायदा असावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली. गोसंरक्षणाच्या नावाखाली केल्या जाणा-या हिंसाचारामुळे मुळ हेतूचीच कुप्रसिद्धी होत असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
राजस्थानच्या अलवरमध्ये गोरक्षकांनी एका अल्पसंख्याक व्यक्तीला मारहाण केली. या मारहाणीमध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भाजप आणि संघावर टीका होत आहे. महावीर जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमाला सरसंघचालकांनी हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये भागवतांनी गोरक्षकांना खडे बोल सुनावले.