पणजी : गोव्यातली परफ्युम स्पेशालिस्ट मोनिका घुरडे हिचा खून बदला, पैशाची लालसा आणि वासनेतून झाल्याचं स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी राजकुमार सिंग याला बंगळुरूमधून अटक केली होती. त्यानं ही सगळी कबुली दिली. त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर गोव्यातल्या संगोल्डामधल्या सपना राज व्हॅली या उच्चभ्रू सोसायटीत मोनिका गोर्डेचा ६ ऑक्टोबरला खून झाला होता. गोवा पोलिसांनी या खुनाच्या तपासासाठी पाच पथकं तयार केली होती. सगळ्यात आधी पोलिसांनी या सोसायटीच्या आधीच्या सुरक्षारक्षकाला अटक केली. 


राजकुमार सिंगला मोनिकाची छत्री चोरल्याच्या आरोपावरुन सोसायटीतून काढून टाकलं होतं. तेव्हापासून त्याचा तिच्यावर राग होता. या रागातूनच त्यानं मोनिकाचा काटा काढायचं ठरवलं. राजकुमार सिंग तिच्या घरी गेला, तिनं दरवाजा उघडताच तिला सु-याचा धाक दाखवला.  त्यानंतर तिच्याकडचे पैसे आणि एटीएम घेतले. त्यानंतर तिचे हातपाय बांधले, तिला जबरदस्तीनं मोबाईलमधली ब्ल्यू फिल्म दाखवली आणि नंतर तिच्यावर बलात्कार करुन तिचा खून केला.