नवी दिल्ली : काली बारी मार्गावर एक धक्कादायक बाब समोर आलेय. एका राहत्या घरामध्ये मुलाच्या मृतदेहासोबत एक वृद्ध महिला चार दिवस बसून होती. दरम्यान, शेजाऱ्यांना वास आल्यानंतर ही घटना समोर आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामदुलारी (६०) आणि मुलगा कपिल (३२) हे दोघेच राहात होते. कपिल गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. झोपेत असतानाच त्याचे निधन झाले. मात्र, कपिल झोपेत असेल असे समजून त्याची आई त्याच्या मृतदेहाशेजारी चार दिवस बसून राहिली.


गतवर्षी रामदुलारी यांच्या पतीचे निधन झाले. तर तीन मुलींचे विवाह झालेले आहेत. त्यामुळे ती आणि मुलगा असे राहत होते. दरम्यान, शेजारच्यांना वास येऊ लागल्यामुळे याबाबतची माहिती त्यांच्या मुलींना आणि पोलिसांना दिली. 


पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो रुग्णालयात हलविला. कपिलच्या मृत्युमुळे रामदुलारी यांच्या मनावर परिणाम झालाय, असे त्यांच्या मुलींनी सांगितले.