महिलांवरील वाढते हल्ले आणि अत्याचाराला चित्रपट जबाबदार - मनेका गांधी
महिलांवरील वाढते हल्ले तसंच अत्याचारांना सिनेमा कारणीभूत असल्याचे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी म्हटलंय.
गोवा : महिलांवरील वाढते हल्ले तसंच अत्याचारांना सिनेमा कारणीभूत असल्याचे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी म्हटलंय.
गोवा फेस्टमध्ये आयोजित कार्यक्रमात मनेका गांधी यांनी आपलं मत मांडलं.. सिनेमात रोमान्सची सुरुवात ही छेडछाडीनं होते. एक व्यक्ती आणि त्याचे मित्र महिलेला घेरतात, तिच्या मागे पुढे फिरतात, तिला अपमानित केलं जातं असं मनेका गांधी यांनी म्हटलंय.
सिनेमातील सीन्स एवढ्यावरच थांबत नाहीत. पुढे त्या महिलेला छेडलं जातं आणि काही काळानंतर हीच महिला त्या व्यक्तीच्या प्रेमात पडते अशा फिल्मी सीन्समुळे महिलांवरील अत्याचार वाढल्याचा दावा मनेका गांधी यांनी केलाय..
त्यामुळे सिनेमा आणि जाहिरात क्षेत्रातील व्यक्तींनी महिलांची योग्य छबी दाखवावी असं आवाहनही मनेका गांधींनी केलंय..