नवी दिल्ली : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी, 'नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी एक आठवड्यासाठी मागे घ्यावा', अशी मागणी  केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलायमसिंह म्हणाले, 'नागरिकांना नियमित गरजेच्या वस्तू मिळणं देखील कठीण झालं आहे. बाजारपेठा देखील बंद आहेत. रुग्णांवरील उपचार बंद झाले आहेत आणि भाजपला निवडणुका दिसत आहेत'.


'सरकारच्या या निर्णयासोबत असल्याचंही सांगितलं, मात्र महिलांनी एक-एक रुपया जमा करत घरगुती बचत केली आहे. त्यामुळे महिलांना ५ लाखांपर्यंत सूट देण्यात यावी', असं देखील मुलायम सिंह यादव यांनी म्हटले आहे.