नवी दिल्ली : हरियाणातील जाट आंदोलनादरम्यान मुरथलमध्ये सामूहिक बलात्कार झाला होता.  मुरथलच्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांकडे काही तक्रारी दाखल आहेत. आता प्रकाश सिंह कमेटीने देखील आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय, मुरथलच्या ढाब्यावर मुली बिना कपड्याच्या पोहोचल्या होत्या.


सर्वात भयानक सामूहिक बलात्कार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणात २६ फेब्रुवारी रोजी महिलांचे कपडे मिळाले होते. तेव्हा फक्त या गोष्टीवरून अंदाज बांधले जात होते की महिलांवर येथे सामूहिक बलात्कार झाला आहे. 


यानंतर कोर्टाने हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत पोलिसांना हेल्पलाईन सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर काही महिलांनी मुरथलमध्ये आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली होती.


कोर्टाने ताकीद दिल्यानंतर तक्रारी दाखल


मुरथलमध्ये गँगरेप झाला याला प्रकाश सिंह कमेटीच्या रिपोर्टवरून दुजोरा मिळतोय. पंजाब हरियाणा हायकोर्टाला सोपवलेल्या रिपोर्टमध्ये प्रकाश सिंह समितीने म्हटलं आहे की, जाट आंदोलना-दरम्यान मुरथल ढाब्यावर काही मुली नग्न अवस्थेत आल्या होत्या, या मुलींना हॉटेल मालकाने चादरी आणि कपडे देऊन घरी पोहोचवण्याची सोय केली होती.


हॉटेल मालकाने मुलींन चादरी आणि कपडे दिले


रिपोर्टमध्ये ही माहिती असली तरी यात ढाब्याचा मालक आणि नावाचा कोणताही उच्चार केलेला नाही. मात्र प्रकाश सिंह समितीने ढाबा मालकाची साक्ष नोंदवली आहे.


हरियाणात फेब्रुवारी महिन्यात जाट आरक्षण आंदोलन झालं होतं. या हिंसक आंदोलनात ३० लोकांचा मृत्यू झाला होता, आणि असा आरोप होतोय की याच दरम्यान हायवेवरून जाणाऱ्या गाड्या थांबवून महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.