नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुस्लीम तरुणीच्या मदतीसाठी पुढे आले. एका मुस्लीम विद्यार्थीनीचं शिक्षण थांबू नये म्हणू पंतप्रधान कार्यालयाने कर्नाटकच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून तात्काळ मदत पुरवण्याचे आदेश दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकमधील मांड्यामधील एका मुस्लीम विद्यार्थिनीला एमबीएसाठी अॅडमिशन घ्यायचं होतं त्यासाठी तिला एज्यूकेशन लोन हवं होतं. बँकेने लोन देण्याच नकार दिला होता. त्यामुळे साराने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मदत मागितली.


पीएमओच्या आदेशानंतर विद्यार्थिनीला बँकेने १.५ लाखांचं लोन दिलं आहे. पण साराला हे एज्यूकेशन लोन दूसऱ्या बँकेने दिलं आहे. साराने आधीचं लोन भरलं नव्हतं म्हणून तिला दुसऱ्यांदा लोन नाकारण्यात आलं होतं.


अब्दुल इलियास यांची मुलगी सारा उच्च शिक्षण घेऊ इच्छिते. वडिलांची आर्थिक स्थिती इतकी चांगली नाही. बँकेने आधीचं लोन फेडल्यानंतर दुसरं लोन मिळेल असं म्हटलं होतं. त्यानंतत साराने पंतप्रधानांना पत्र लिहून मदत मागितली होती. 


पीएमओच्या आदेशानंतर विजया बँकेने एज्यूकेशन लोन दिलं. साराला एका पत्राच्या आधारे पंतप्रधानांकडून मदत मिळेल असा विश्वास नव्हता. पण पंतप्रधानांच्या मदतीनंतर सारा आणि तिच्या वडिलांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.