गाजियाबाद : तीन वेळा तलाक म्हणत महिलांच्या हक्कांची पायमल्ली करणाऱ्या धर्माशी नातं तोडत एका महिलेनं धर्मपरिवर्तनाचा मार्ग स्वीकारलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाजियाबादमध्ये शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित आर्यन यांच्या नेतृत्वाखाली या मुस्लीम महिलेनं हिंदू धर्मात प्रवेश केलाय. या महिलेचा धर्मपरिवर्तनाचा याआधीही दोन वेळा प्रयत्न झाला होता. परंतु, दोन्हीही वेळा हा प्रयत्न फसला होता. परंतु, यावेळी कमालीची गुप्तता पाळत हा विधी पूर्ण करण्यात आला. 


इस्लामिक जाचक परंपरेला छेद देण्यासाठी आपण हा मार्ग स्वीकारल्याचं या महिलेनं म्हटलंय. यासाठी तिनं शिवसेनेची मदत घेतलीय. 


महिलेच्या म्हणण्यानुसार, 2014 मध्ये तिच्या पतीनं तिला तीन वेळा तलाक म्हणत वाऱ्यावर सोडलं होतं. यावेळी तिला दोन मुलं होती. 


तीन तलाकच्या मुद्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारनं हे महिलांच्या अधिकारांचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय. या प्रकरणावर सध्या सुप्रीम कोर्टातही चर्चा सुरू आहे.