हैदराबाद : नोटबंदीमुळे मुस्लिमांना त्रास दिला जात असल्याचं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी केलं आहे. मुस्लिम भागांमध्ये असणारी एटीएम रिकामी आहेत, इथल्या बँका उघडल्या जात नाहीत. मोदी सरकार कॅशलेसच्या नावाखाली नागरिकांना त्रास देत असल्याचं ओवेसी म्हणाले आहेत.


नोटबंदीच्या माध्यमातून मुस्लिमांसोबत भेदभाव केला जात असल्याचा आरोपही ओवेसीनं केला आहे. एटीएममधून पैसे काढण्याच्या रांगेत उभे असताना अनेकांचा मृत्यू झाला आहे. बाजारामध्येही नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. नोटबंदीचा हा निर्णय काहीही विचार न करता घेण्यात आला आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था बुडेल अशी टीकाही ओवेसींनी केली आहे.