छत्तीसगड : सोमवारी सुकमा जिल्ह्यात झालेल्या नक्षली हल्ल्यात मध्यप्रदशच्या रीवा जिल्ह्यातील नारायण सोनकर शहीद झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुर्भाग्य म्हणजे, सोमवारी सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास सोनकर यांनी फोनवरून घरी संपर्क साधला होता. पत्नी सुनीता, मुलगा दीपक आणि मुलगी सुधा यांच्यासोबत हसत-खेळत गप्पाही मारल्या... आणि त्यानंतर काही वेळातच नक्षलवादी हल्ल्यात नारायण शहीद झाल्याची बातमी येऊन थडकली. हे ऐकल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा आपल्या कानावर विश्वासदेखील बसत नव्हता. 


रीवा जिल्ह्यातील त्योंथरमधल्या गंगतीरा इथे सोनकर यांचं कुटुंब स्थायिक झालंय. चार भावांच्या कुटुंबात नारायण तिसऱ्या क्रमांकाचे भाऊ होते. 2000 साली ते सीआरपीएफमध्ये दाखल झाले होते. सोनकर शहीद झाल्याची बातमी समजताच मध्यप्रदेशमधील त्यांच्या गावावर शोककळा पसरलीय. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या 25 जवानांपैंकी सोनकर हे एक आहेत.