मोदी मुंबईवर उदार, दिले १०,९४७ कोटी...
केंद्र सरकार मुंबईवर चांगलंच उदार झाल्याचं दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एमयुटीपीच्या फेज 3 ला मंजुरी दिली. 10,947 कोटींचा हा प्रकल्प आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकार मुंबईवर चांगलंच उदार झाल्याचं दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एमयुटीपीच्या फेज 3 ला मंजुरी दिली. 10,947 कोटींचा हा प्रकल्प आहे.
येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल. मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेच्या तीनही मार्गांवरचे महत्त्वाचे प्रकल्प एमयुटीपी 3 मुळे तातडीने मार्गी लागतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर तसंच मध्य रेल्वेवर काही रेल्वे मार्गाचं विकासकार्य या प्रकल्पाअंतर्गत होईल. विरार डहाणू, कर्जत पनवेल मार्ग तसंच कळवा ऐरोली दरम्यान नवा मार्ग उभारण्यात येईल. या प्रकल्पाचा मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे.
MUTP-3 चे फायदे काय?
- कॉरिडॉरमुळे ट्रान्स हार्बरसाठी ठाण्याला गाडी बदलण्याची गरज पडणार नाही
- पनवेल कर्जत मार्गाचं दुहेरीकरण, परिसरातल्या विकासकामांना गती
- पनवेल कर्जत कॉरिडॉरमुळे नवी मुंबईमार्गे सीएसटी- कर्जत अंतर कमी वेळेत कापणे शक्य
- ऐरोली- कळवा कॉरिडॉरमुळे कल्याणहून थेट गाडी ट्रान्स हार्बर मार्गावर जाईल
- कॉरिडॉरमुळे ट्रान्स हार्बरसाठी ठाण्याला गाडी बदलण्याची गरज पडणार नाही