नवी दिल्ली : डिजीटल इंडियासाठी नरेंद्र मोदी सरकारने काही योजना आखल्याचं सांगितलं, यात सर्वाधिक महत्वाचं आणि प्रभावी भीम अॅप ठरणार असल्याचा दावा होत आहे. 
भीम अॅपमुळे अनेक व्यवहार सोपे होणार आहेत. डिजीटल इंडियासाठी केंद्र सरकारने खालील गोष्टींवर जोर दिला आहे.


• सव्वा कोटी लोकांपर्यंत भीम ऍप पोहचलं
• भीम ऍपमधून पेट्रोल पंपावर पेमेंट करता येणार
• ऍपच्या माध्यमातून शाळा कॉलेजची फी भरता येणार
• डिजीटल पेमेंटसाठी दरवर्षी 2500कोटींचं लक्ष्य
• राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेतून 20 हजार कोटी
• मुद्रा योजनेसाठी 2 लाख 44 हजार कोटींचं लक्ष्य
• पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट दिला जाणार