नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नीती आयोगाचे सदस्य, देशातले प्रमुख अर्थशास्त्रज्ञ आणि संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेवर झालेल्या चांगल्या आणि वाईट परिणामांची चर्चा होईल.


नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासचा दर कमी होईल असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं वर्तवलाय. त्याविषयी उपाय योजनावर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. शिवाय नीती आयोगाकडून देशात कॅशलेस अर्थव्यवस्थकडे जाण्याची मोहीम आणखी प्रभावीपणे लागू करण्यासाठी महत्वाची पावलं उचलण्यासंदर्भातही सूचना यावेळी देण्यात येतील.