अडीच हजार रुपयात विमान प्रवास, मोदींकडून `उडान`चं उद्घाटन
हवाई वाहतूक सामान्यांच्या आवाक्यात आणणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी `उडान` या योजनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
नवी दिल्ली : हवाई वाहतूक सामान्यांच्या आवाक्यात आणणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी 'उडान' या योजनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे मोदींनी शिमला-दिल्ली आणि नांदेड हैदराबाद विमान सेवा सुरू केली. उडान योजनेमुळे 45 मिनिटांपर्यंतचा प्रवास अवघ्या अडीच हजार रुपयांमध्ये करता येणार आहे. येत्या चार ते पाच महिन्यात देशातली अनेक छोटी मोठी शहरं या योजने अंतर्गत जोडली जाणार आहेत.