नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेनेनं आपल्या तलवारी अखेर म्यान केल्यात. शिवसेना खासदारांनी 
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.


मुझे बालासाहबजी को उपर जाकर जवाब देना है
शिवसेना क्या करेगी मुझे पता नही 
लेकीन मै डिसिजन वापस नही लूंगा
और तुम कहाँ जाओगे? हमारे साथही आओगे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्णयावर नाराज असलेल्या शिवसेना खासदारांनी मंगळवारी पंतप्रधानांची भेट घेतली. जिल्हा बँकांवरचे आर्थिक निर्बंध उठवण्याची मागणी त्यांनी केली. त्यावेळी मोदींनी असे शालजोडीतले फटके लगावले. 


मी रिझर्व्ह बँकेशी चर्चा करतो, पण तुमची आंदोलनं आधी मागे घ्या, असा दमही मोदींनी यावेळी भरला. त्यामुळं बुधवारी विरोधकांच्या धरणे आंदोलनात सहभागी होणार नसल्याचं थंडावलेल्या शिवसेनेनं आता स्पष्ट केलंय.


नोटाबंदीवरून ममता बॅनर्जींनी काढलेल्या मोर्चात शिवसेना खासदार सहभागी झाले होते. त्यानंतर राजनाथ सिंह, अरूण जेटली या भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी याबाबत चर्चाही केली. आता मोदींना बाळासाहेब आठवले हे बरं झालं, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदींना प्रति टोमणा लगावलाय.


शिवसेना-भाजपमध्ये निर्माण झालेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र मुलीच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेल्याचा खुलासा गडकरींनी केलाय.