नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं आहे. मुख्य म्हणजे मोदींनी हे ट्विट मराठीमध्ये केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना नमन. त्यांच्यासारखे शूर आणि महान व्यक्तिमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे, असं मोदी या ट्विटमध्ये म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमीच प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. ते एक उत्तम प्रशासकीय कौशल्य लाभलेले आदर्श राज्यकर्ते होते. शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असा भारत घडवण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्नशील आहोत, असा विश्वासही त्यांनी दिला आहे.


नुकतेच अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या भव्य शिवस्मारकचे जल-भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. हा दिवस सदैव स्मरणात राहील, असंही मोदी म्हणाले.