अमृतसर : भारतीय जनता पक्षाच्या अमृतसरमधील आमदार आणि माजी क्रिकेटपटू व माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 'मी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. माझ्यावरील ओझं कमी झालं आहे,' अशी पोस्ट त्यांनी शुक्रवारी फेसबूकवर टाकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर आधी त्यांच्या राजीनाम्याची बातमी म्हणजे 'एप्रिल फूल'चा जोक असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. मात्र नंतर कौर यांनीच खुद्द फेसबूकवर स्पष्टीकरण दिलं. गेले काही दिवस भारतीय जनता पक्ष आणि शिरोमणी अकाली दल यांच्या धोरणांशी आपण असहमत असल्याने त्यांनी हा राजीनामा दिला आहे. 



एप्रिल महिन्यात पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. आधीच अडचणीत असलेला भारतीय जनता पक्ष आता या राजीनाम्यामुळे आणखीनच संकटात सापडला आहे. २०१४ सालच्या निवडणुकांपासून पक्षावर नाराज असलेले नवज्योतसिंग सिद्धूही आता पक्षातून बाहेर पडतील आणि आम आदमी पक्षाची कास धरतील, अशा शक्यता आता वर्तवल्या जात आहेत.