बिहारमध्ये जखमी जवानांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी लागले १० तास
बिहारमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत.
गया : बिहारमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. पार्थिवावर लवकरच अंत्यसंस्कार केले जातील. उल्लेखनीय म्हणजे, हल्ल्यानंतर जखमी जवानांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी सुरक्षा दलाला तब्बल १० तास लागल्याचं समोर येतंय.
मदतीसाठी का लागला १० तासांचा अवधी?
बिहारमधल्या औरंगाबाद जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात १० कमांडो शहीद झालेत. यावेळी झालेल्या चकमकीत ३ नक्षलींनाही कंठस्नान घालण्यात आले आहे. जखमी कमांडो यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. हल्ल्याच्या वेळी नक्षलींना एकूण १७ स्फोट घडवून आणल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
शनिवारी सीआरपीएफच्या जवानांनी जंगलात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. सोमवारी सकाळी नक्षलीनी डाव साधला. अचानक झालेल्या स्फोटांच्या मालिकेत १० जवान शहीद झालेत. अद्याप या जवानांची नावं समजू शकलेली नाहीत.