नवी दिल्ली : देशातील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी २ आठवडे लागतील, असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे. देशाचं ८६ टक्के चलन बदलल्याने थोडा वेळ द्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच नवीन नोटा आलेल्या आहेत, त्याचं सेटिंग्ज बदलण्यास वेळ लागेल, नव्या नोटांची साईझ सुद्धा वेगळी आहे. जवळ-जवळ २ लाख एटीएम मशीन्स आहेत, त्यात मॅकेनिक तांत्रिक बदल करतील, त्याला थोडासा वेळ लागेल, असंही यावेळी अरूण जेटली यांनी सांगितलं.


लोकांना त्रास होतोय, पण लोक सहकार्य करत आहेत, हे महत्वाचं असल्याचंही यावेळी अरूण जेटली यांनी सांगितलं.