नवी दिल्ली : नेते, अभिनेते आणि सामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिल्लीतील रिगल चित्रपटगृह आता अखेरच्या घटका मोजत आहे. चित्रपटगृह चालवणं परवडत नसल्यानं रिगल चित्रपटगृह आता बंद पडणार आहे. दंगल हा अखेरचा चित्रपट रिगलमध्ये लावण्यात आला आहे. त्यानंतर दिल्लीतल्या सिंगल स्क्रीन युगाचा कायमचा अस्त होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माऊंट बॅटन,  पंडीत जवाहरलनेहरू यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची वर्दळ असायची. मात्र मल्टीप्लेक्सच्या युगात दिल्लीतलं हे सिंगलस्क्रीन थिएटर आता अखेरच्या घटका मोजतंय..


कोणत्याही चित्रपटाचा प्रिमियर सर्वात आधी दिल्लीतल्या याच रिगल थिएटरमध्ये प्रदर्शित व्हायचा. त्यामुळे या चित्रपटगृहानं अनेक दिग्गज कलाकार पाहिले.. राजकपूर आणि रिगल सिनेमा हे तर एकेकाळचं समिकरणच होतं.


मात्र आता थिएटर चालवण्यात अनेक अडचणी येत आहेत. आठवड्याचा खर्च अडीच लाख, त्यात कामगारांचा पगार, वीज बील, मेंटनन्स असा हिशोब करता उत्पन्नातून दमडीही मिळत नाही.


रिगलप्रमाणे दिल्लीतल्या 49 सिंगलस्क्रीन थिएटरची अशीच अवस्था. म्हणूनच एकापाठोपाठ सर्व सिंगलस्क्रीन थिएटर धडाधड बंद पडले.. पदरमोड कडून रिकल कसंबसं सुरु होतं.. मात्र तेही आता बंद होणार आहे.