`लेटलतीफ` प्रवाशांसाठी एअर इंडियाचा नवा नियम
आपल्या बेशिस्त वर्तनामुळे एअर इंडियाचं विमान लेट करणाऱ्या प्रवाशांना यापुढे जबर दंड भरावा लागणार आहे. विमान 1 तास लेट केल्यास 5 लाख, 1 ते 2 तास उशीर केल्यास 10 लाख आणि दोन तासांपेक्षा जास्त उशीर केल्यास तब्बल 15 लाख दंड भरावा लागणार आहे.
नवी दिल्ली : आपल्या बेशिस्त वर्तनामुळे एअर इंडियाचं विमान लेट करणाऱ्या प्रवाशांना यापुढे जबर दंड भरावा लागणार आहे. विमान 1 तास लेट केल्यास 5 लाख, 1 ते 2 तास उशीर केल्यास 10 लाख आणि दोन तासांपेक्षा जास्त उशीर केल्यास तब्बल 15 लाख दंड भरावा लागणार आहे.
सर्वसामान्य प्रवाशांसाठी एअर इंडियाची विमानं थांबत नसली, तरी व्हीव्हीआयपी प्रवासी मात्र विमानांची उड्डाणं रोखून धरतात.
शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड आणि तृणमूलच्या खासदार डोला सेन यांनी कर्मचाऱ्यांशी घातलेल्या वादामुळे विमानांचं उड्डाण रखडलं होतं. त्यानंतर आता एअर इंडियानं हा नवा नियम केलाय.