नवी दिल्ली : देशभर खादीचा प्रचार, प्रसार आणि उत्पादन करणाऱ्या खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आल्याचा वाद निर्माण झाला होता. पण या वादाला आता वेगळं वळणं लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर याआधी महात्मा गांधींचा फोटो नसल्याची प्रतिक्रिया खादी व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन(केव्हीआयसी)च्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिले आहेत.


1996, 2002, 2005, 2011,2012, 2013 आणि 2016 या वर्षी निघालेल्या कॅलेंडरमध्ये महात्मा गांधींचा फोटो नव्हता, त्यामुळे कॅलेंडरमधून गांधींना बदलून मोदींना टाकण्याचा प्रश्नच नसल्याचंही केव्हीआयसीकडून सांगण्यात आलंय. केव्हीआयसीनं हे स्पष्टीकरण दिलं असलं तरी या वर्षांमध्ये कॅलेंडरमध्ये कोणाचे फोटो होते, याबाबत मात्र गोंधळ कायम आहे.


काँग्रेसच्या 50 वर्षांच्या काळामध्ये खादीची विक्री दोन ते सात टक्क्यांपर्यंत होती तिच विक्री मागच्या दोन वर्षांमध्ये 34 टक्क्यांपर्यंत गेल्याचंही केव्हीआयसीच्या सूत्रांनी सांगितलं आहे.