सहा महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; रात्री झोपायला गेले पती-पत्नी आणि...
येथील आदर्शनगरमध्ये एका पती-पत्नीचा मृतदेह संशायस्पद आवस्थेत सापडला. त्यांचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पाण्याने भरलेल्या एका टबमध्ये वीजेची तार पडलेली सापडली, त्यात पतीचा हात विट बांधून ठेवलेला होता. तर पत्नीने पतीचे पाय पकडलेले होते.
फरीदाबाद : येथील आदर्शनगरमध्ये एका पती-पत्नीचा मृतदेह संशायस्पद आवस्थेत सापडला. त्यांचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पाण्याने भरलेल्या एका टबमध्ये वीजेची तार पडलेली सापडली, त्यात पतीचा हात विट बांधून ठेवलेला होता. तर पत्नीने पतीचे पाय पकडलेले होते.
24 वर्षीय दीपक आणि 22 वर्षांची कोमल यांचा 22 फेब्रुवारी 2016 रोजी विवाह झाला होता. दीपक एका खासगी कंपनीत काम करत होता, तर कोमल हॉस्पिटलमध्ये नर्स होती. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर दीपकची आई कमलेश यांनी सांगितले, की दोघांमध्ये सगळे काही व्यवस्थित होते. रविवारी रात्री दोघे पती-पत्नी व्यवस्थित झोपण्यासाठी गेले होते.
सोमवारी सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा दीपक आणि कोमल मृतावस्थेत आढळले. दीपकच्या एका हाताला विट बांधलेली होती, तो हात पाण्याने भरलेल्या टबमध्ये होता. टबमध्ये वीजेची तार पडलेली होती, सकाळीही त्यात करंट होता. तर, दुसरीकडे दीपकडे पाय पकडून कोमलचा मृतदेह पडलेला होता.
शक्यता आहे की वीजेचा शॉक बसल्याने दोघांचा मृत्यू झाला, मात्र दीपकच्या हाताला विट असल्याने त्याच्या आईने ही आत्महत्या असल्याचे म्हटले आहे.
कोमलच्या माहेरच्या लोकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. मुलीचा भाऊ जितेंद्रचा आरोप आहे की दीपकची आई कोमलला हुंड्यासाठी त्रास देत होती. तिने कारची मागणी केली होती, दीपक आणि कोमल या दोघांनाही ती त्रास देत होती. कोमलचा भाऊ जितेंद्रची तक्रार पोलिसांनी स्विकरली असून अजून गुन्हा दाखल केलेला नाही.