ही बातमी २८ वर्षाच्या आत वय असणाऱ्यांसाठी आहे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २८ वर्ष वय असलेल्या युवकांना मोठी भेट दिली आहे. आरबीआयने असिस्टंट केडर पोस्टसाठी ६१० पदांची भरती काढली आहे. ही निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीने होणार आहे.
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २८ वर्ष वय असलेल्या युवकांना मोठी भेट दिली आहे. आरबीआयने असिस्टंट केडर पोस्टसाठी ६१० पदांची भरती काढली आहे. ही निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीने होणार आहे.
जर तुम्हालाही नोकरीच्या संधीचा शोध असेल, तर २८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात.
कमीत कमी ५० टक्के मार्क्स मिळवणारे या पदासाठी अर्ज करू शकतात.
माजी सैनिकांनाही यात संधी देण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात.