नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्याचा तपास करणा-या NIAच्या अधिका-याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीये. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात ही घटना घडलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस उपअधीक्षक तनजील अहमद असं या अधिका-याचं नाव असून मारेक-यांनी त्यांच्यावर तब्बल 21 गोळ्या झाडल्यात. या हल्ल्यात त्यांची पत्नीही जखमी झालीये. तिची प्रकृती चिंताजनक असून उपचारासाठी तिला दिल्लीतील एम्स हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलंय. 


दहशतवादाविरोधातील अनेक प्रकरणांच्या तपासामध्ये तनजील अहमद यांचा सहभाग होता. एका लग्न समारंभावरुन परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोर मोटारसायकलवरुन आल्याची प्राथमीक माहिती पोलिसांना मिळालीये. हा पूर्व नियोजीत कट असल्याचं एएनआयनं स्पष्ट केलंय. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.