गिर : गुजरातमधलं गिरचं अभयारण्य आशियाई सिंहांच्या मोठ्या संख्येसाठी प्रसिद्ध आहे. इथे होणा-या प्राणी संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यामुळेच की काय अशी विहंगम दृष्यं कॅमरात कैद होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिरमध्ये सध्या भीषण उष्मानं प्राणी पक्षी हैराण आहेत. याच उष्मानं त्रासलेलं सिंहांचं एक अख्खं कुटुंब पाणवठ्यावर आलं. एक नाही दोन नाही, तब्बल 9 सिंह पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आले. गिरचे वनक्षेत्र अधिकारी डॉक्टर संदीप कुमार यांनी हा व्हीडिओ शूट केलाय. 


पाहा डोळे सुखावणारा सिंहांचा हा व्हिडिओ