नवी दिल्ली :  केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आपल्या गाडीवरील लाल दिवा काढून टाकला आहे. १ मे रोजी या निर्णयाची अंमलबजावणी होणार होती, पण निर्णयाची वाट न पाहता नितिन गडकरी यांनी आजपासून लाल दिवा काढून टाकला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीनंतर महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणताही केंद्रीय मंत्री लाल दिवा गाडी वापरणार नाही, असा निर्णय घेतला आहे.


१ मे अर्थात कामगार दिवसापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.


दरम्यान, त्या त्या राज्यात मंत्री लाल दिवा गाडी वापरणार की नाही, याबाबतचा निर्णय राज्यांवर सोपविण्यात आलाय. लाल दिवा वापरण्याबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारवर जबाबदारी सोडली आहे.