नवी दिल्ली : आधार कार्डबाबत महत्वाची बातमी. सरकारी कारभाराबाबत ऑनलाइन तक्रार करताना आता आधार कार्ड क्रमांक देणे बंधनकारक नाही, अशी माहिती केंद्रीय तक्रार निवारण राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

www.pgporatal.nic.in या संकेतस्थळावर लोक तक्रारी करु शकतात. त्यासाठी आधार क्रमांक देणे बंधनकारक नव्हे तर ऐच्छिक असल्याचे सिंग यांनी यावेळी स्पष्ट केले.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार या दस्तावेजला कायद्याची ओळख देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे यापुढे आधार कार्ड ही ओळख सर्वत्र ग्राह्य मानली जाईल. आधार कार्डला घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे यापुढे आधार कार्ड प्रत्येकाकडे असणे जरुरीचे आहे.