मुंबई : वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली पालकांकडून लूट करणा-या सीबीएसई बोर्डाच्या शाळांना लगाम लावण्यासाठी सीबीएसई बोर्डानं आदेश जारी केले आहेत. स्टेशनरी, पुस्तकं, स्कुल बॅग या वस्तू शाळेतून घेण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. तसं केलं तर बोर्डच्या कायद्यानुसार शाळेची मान्यता रद्द केली जाऊ शकते अशी तंबीही सीबीएसई बोर्डानं दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीबीएसई बोर्डच्या खासगी शाळांकडून विविध मार्गांनी पालकांकडून फी वसूल केली जाते. त्याविरोधात देशभरातल्या पालकांनी आवाज उठवायला सुरूवात केलीय. त्यामुळं आता सीबीएससी बोर्डाला जाग आलीय.  


मुंबई आणि देशातल्या सर्वच शहरी आणि ग्रामीण भागात खासगी शाळा सर्रास पालकांकडून पुस्तकं वह्या, हॉबी क्लास सहल गणवेश या नावाखाली भरमसाठ पैसा जमा करत असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान आता सीबीएससी बोर्डच्या नोटीशीनंतर राज्य सरकारचं शिक्षण विभाग शाळांवर कारवाई करणार का याकडे पालकांचं लक्ष लागलंय.