मणिपूरमध्ये पुढील एक महिना वृत्तपत्र नाही
मणिपूरमध्ये वाचकांना पुढील एक महिना न्यूज पेपर मिळणार नसल्याचं दिसून येत आहे. मणिपूर राज्यातील एकमेवर वृत्तपत्र वितरकाला दुकान बंद ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा एका विद्यार्थी संघटनेने लादली आहे. यामुळे मणिपूरमधील नागरिकांना पुढील एक महिना वृत्तपत्र न मिळण्याची शक्यता आहे. येथील कांग्लिपाक विद्यार्थी संघटनेने ही शिक्षा केली आहे.
इंफाळ : मणिपूरमध्ये वाचकांना पुढील एक महिना न्यूज पेपर मिळणार नसल्याचं दिसून येत आहे. मणिपूर राज्यातील एकमेवर वृत्तपत्र वितरकाला दुकान बंद ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा एका विद्यार्थी संघटनेने लादली आहे. यामुळे मणिपूरमधील नागरिकांना पुढील एक महिना वृत्तपत्र न मिळण्याची शक्यता आहे. येथील कांग्लिपाक विद्यार्थी संघटनेने ही शिक्षा केली आहे.
या पुस्तकातील मजकुरात अनेक गंभीर चुका असल्याचा आरोप आहे, त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, जैन यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करणाऱ्या संस्थेने पुस्तकातील 'चुकां'बद्दल माफी मागितली आहे. मणिपूरबाबत चुकीची माहिती प्रसिद्ध करणाऱ्या काही पुस्तकांवर यापूर्वीही 'केएसए'ने बंदी घातली होती.
मणिपूरमध्ये मेसर्स पी. सी. जैन आणि कंपनी हे एकमेव वृत्तपत्र वितरक आहेत. लेखक आर. गुप्ता यांनी लिहिलेल्या सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांना 'केएसए'चा विरोध आहे. या पुस्तकांवर त्यांनी 'बंदी' घातली आहे. जैन हे या पुस्तकांचा साठा करून ते विकत असल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांना आढळून आल्याने त्यांनी जैन यांना एक महिना त्यांची दुकाने बंद ठेवण्याची 'शिक्षा' फर्मावली आहे.