२०००च्या नोटा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही - जेटली
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी २०००च्या नोटांबाबतचा मोठा खुलासा केला. चलनात आणलेल्या २०००च्या नव्या नोटा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे जेटली यांनी स्पष्ट केलेय.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी २०००च्या नोटांबाबतचा मोठा खुलासा केला. चलनात आणलेल्या २०००च्या नव्या नोटा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे जेटली यांनी स्पष्ट केलेय.
गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर ५०० आणि १०००च्या नोटा बाद केल्या होत्या. त्याच्याऐवजी २००० आणि ५००च्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या.
जेटली यांनी लोकसभेत ही माहिती दिली. २०००च्या नव्या नोटा चलनातून बाद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाहीये. १० नोव्हेंबर २०१६ पर्यंत जुन्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या एकूण १४.४४ लाख कोटी रुपये आरबीआयमध्ये जमा करण्यात आल्याचेही जेटलींनी यावेळी सांगितले.