नवी दिल्ली : भारतीय डाक सेवा अर्थात पोस्ट. पोस्टात ऑनलाईन सेवा सुरु करण्यात आलेय. मात्र, ही सेवा काही दिवसांपासून बिघाडामुळे बंद होती. त्यामुळे पोस्टात गुंतवणुकीसाठी सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागत होती. यावर मार्ग 'ऑफलाइन' काढण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तांत्रिक बिघाडामुळे सर्वसामान्य ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी पोस्टाकडून स्वीकारल्या जात नव्हत्या. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे पोस्टातील गुंतवणुकीला आळा बसला होता. केंद्रीय स्तरावर हालचाली झाल्यानंतर पोस्टात आता 'ऑफलाइन' पद्धतीने गुंतवणूक स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य खातेदारांना ३१ मार्चपर्यंत जुन्या व्याजदरांनुसारच गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.
 
पोस्टात 'कोअर बँकिंग' आणि अन्य गोष्टींसाठी तांत्रिक सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पोस्टातील सर्व्हरच्या कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या निर्माण झाली आहे. त्यातच पोस्टातील ठेवयोजनांवरील व्याजदर एक एप्रिलपासून कमी होणार आहेत. त्यामुळे तत्पूर्वी गुंतवणूक करण्यासाठी पोस्टात गर्दी वाढत होती. याला आता खिळ बसणार नाही.


तांत्रिक कारणामुळे पोस्टातील अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आलेल्या खातेदारांना निराश होऊन परतावे लागत होते. या पार्श्वभूमीवर पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी सोमवारी दिल्लीत दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांची भेट घेऊन त्यांना या समस्येविषयी माहिती दिली. या भेटीनंतर रवीशंकर प्रसाद यांनी तांत्रिक बिघाड दूर होईपर्यंत बिझनेस कंटिन्यूटी प्लॅन कार्यान्वित करण्याचे तसेच पोस्टात ऑफलाइन पद्धतीने ठेवी स्वीकारण्याचे आदेश दिलेत.