नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गांवर आता 18 नोव्हेंबरपर्यंत टोल माफ करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने उडालेला गोंधळ आणि टोल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीला आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे.


टोलनाक्यावर प्रवासी आणि टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांमधले वाद आणि ट्रॅफिकची समस्या लक्षात घेता याआधी 11 नोव्हेंबर आणि मग 14 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरचा टोल माफ करण्यात आला होता. आता परत एकदा नितीन गडकरींनी प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.