नवी दिल्ली : 500 आणि 1000 रूपयांच्या नोटबंदी संबधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक घेतलेल्या निर्णयावर लोकांना नोटा बदलण्यासाठी 50 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे, पंतप्रधानांच्या मते, 50 दिवसात सर्व परिस्थिती व्यवस्थित होईल असे वाटतं आहे, परंतु ज्या गतीने पैसे लोकांपर्यंत पोहचत आहे त्यावरून ५० दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल असे वाटत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीत सांगितल्याप्रमाणे, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी देशातील एकूण नोटांपैकी 17,50,000 कोटी नोटा सरकारकडे जमा होत्या. त्यातील 84 टक्के म्हणजे एकूण 14,50,000 कोटी नोटा या 500 आणि 1000 रूपयांच्या होत्या. सरकारच्या निर्णयामुळे या नोटांना केराची टोपली दाखवावी लागणार आहे.


अर्थमंत्रालयाच्या नवीन आकडेवारीनुसार, 10 नोव्हेंबरपासून 13 नोव्हेंबरपर्यंत 50 हजार कोटी रूपये नवीन नोटांच्या स्वरूपात लोकांपर्यत पोहचवण्यात आले. त्या 100 आणि 2000 रूपयांच्या होत्या, या नोटा लोकांनी एटीएम मधून काढल्या, तसेच बँक आणि पोस्ट ऑफिस अकांउटमधून देखील नोटा काढण्यात आल्या आणि भरण्यात आल्या. एकूण 18 कोटी रूपयांची पैसे भरण्याची आणि काढण्याची प्रक्रिया झाली.


तसेच बँक ,पोस्ट ऑफिस तसेच एटीएम बाहेर रांगा वाढतच आहे त्याबरोबरीने नोटा पण संपत आहेत. अशावेळी पर्यायी पैशाची व्यवस्था करू असे आश्वासन  भारतीय रिझर्व बँकेने केले होते, परंतु याचा काहीच मेळ बसताना दिसत नाही.


समजा, रोज 2000 हजार रूपयांच्या नोटांच्या माध्यमातून 12,500 कोटी रूपये लोकांमध्ये वितरीत होत असतील, आर्थिक व्यवहारात काळा पैसा म्हणून घोषीत करण्यात आलेला पैसा पुन्हा बँकामध्ये जमायला.  कमीत कमी 116 दिवस लागतील.


माहिती आणि आकड्या वरून असे समजते की, जेवढी रक्कम बेकायदेशीर म्हणून जमा होईल, ती नवीन नोटांमध्ये बदलून जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम येणाऱ्या काळात सर्वांना पाहता येईल.