लखनऊ : ग्रामपंचायत निवडणुकीत बाजूनं मतदान न केल्यामुळं सरपंचानं गावातल्या दलित वस्तीतली ३५ घरं पेटवून दिली. ही घटना आहे उत्तर प्रदेशातल्या सीतापूर जिल्ह्यातील देहलिया पत्ती गावातली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेत दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू झालाय. ही घटना आहे सोमवारची. गावचा सरपंच कमलेश वर्मानं ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या बाजूनं मतदान केलं नाही, तर घरं पेटवून देण्याची धमकी गावातील दलितांना दिली होती. 


२७ नोव्हेंबर २०१५ ला ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आणि कमलेश वर्मा पुन्हा एकदा संरपंचपदी निवडून आला. त्यानंतर दलित वस्तीतून आपल्याला मतदान न झाल्याच्या संशयातून त्यानं ३५ घरं पेटवून दिली. या आगीत ८ वर्षांच्या सूर्यांशीचा आणि ४ वर्षांच्या मुकेशचा मृत्यू झाला. काही जनावरंदेखील या दुर्घटनेत दगावलीयत.